Kalyan Patri Bridge | कल्याणचा पत्री पूल मार्चअखेरपर्यंत सुरु होणार | ABP Majha
मार्च अखेरपर्यंत कल्याणचा पत्रीपूल सुरू होणार आहे, इतकंच नाही तर या पुलाच्या बाजूला आणखी एक नवा पूल उभारणार असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. श्रीकांत शिंदे आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली. पूल जीर्ण झाल्याने नोव्हेंबर 2018 मध्ये हा पूल पाडण्यात आलेला. त्यानंतर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना कल्याण-डोंबिवलीकरांना करावा लागला होता. मात्र आता या पुलाचे गर्डर उभारण्याचं काम पूर्णत्वास आलं असून मार्चअखेरपर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे आता लवकरच वाहतूक कोंडीतून कल्याण-डोंबिवलीकरांची सुटका होणार आहे.