Kalyan Dombivali Potholes : भोईरवाडी परिसरातील शेकडो नागरिक रस्त्यावर,मानवी साखळी करत पालिकेचा निषेध
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा भोईरवाडी परिसरात रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे .ठाकुर्ली परिसरातील सर्वाधिक बांधकामं आणि गृहनिर्माण संकुलं खंबालपाडा आणि भोईर वाडी परिसरात तयार होत आहेत. मात्र महापालिका एकीकडे बांधकामांना परवानगी देत असताना पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करत आहे .गटारे ,रस्त्यांच्या डागडुजीसाठी स्थानिक नागरिकांकडून पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जातोय .मात्र पालिका प्रशासन रस्तेदुरुस्ती कडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे . रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी खडी टाकली जाते मात्र त्यामुळे रस्त्याची परिस्थिती आणखीनच बिकट झाल्याचे या परिसरात दिसून येतेय . अनेकदा मागणी करूनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने अखेर आज पालिकेच्या या भूमिकेचा निषेधार्थ आज भोईरवाडी परिसरातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते . सोशल डिस्टंसिंग पालन करत मानवी साखळी तयार करून हातात निषेधाचे फलक घेऊन नागरिकांनी पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला तसेच लवकरात लवकर रस्ते दुरुस्त करा अशी मागणी केली.