Lockdown | कल्याण एपीएमसी अन्यत्र भरणार, गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये होणारी जीवघेणी गर्दी एबीपी माझाने काल समोर आणली होती. यानंतर एपीएमसी मार्केट अन्यत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय एपीएमसी प्रशासनाने घेतला आहे. भाजीपाला बाजारात दररोज फक्त ५० व्यापाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांना फक्त २ टन भाजीपाला आणता येणारेय. कल्याण एपीएमसीचे सभापती कपिल थळे यांनी ही माहिती दिली आहे.