Mumbai Air India : कलिना परिसरातील एअर इंडिया कॉलनीत राहणाऱ्या कुटुंबीयांची निदर्शने
Continues below advertisement
मुंबईच्या कालिना परिसरातील एअर इंडिया कॉलनीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरूच आहे... आता तर त्यांच्या पगारातून मोठी रक्कम कापल्यामुळे कर्मचारी अस्वस्थ आहेत... तर घर कसं चालवायचं, या चिंतेत त्यांच्या गृहिणी आहेत... घराचे भाडे बाजारभावाप्रमाणे पगारातून कापल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातून हजारो रुपये कापण्यात आलेत... त्यामुळे महिना कसा काढायचा, असा सवाल हे कर्मचारी करत आहेत... म्हणूनच एअर इंडियाच्या चारही कॉलनीतील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोर्चा काढून निदर्शने केलीत...
Continues below advertisement