Kalachowki Fire : काळाचौकी मिंट कॉलनी परिसरात भीषण आग, घटनास्थळावरून आढावा ABP Majha

Kalachowki Fire : काळाचौकी मिंट कॉलनी परिसरात भीषण आग, घटनास्थळावरून आढावा ABP Majha

मुंबई :  मुंबईतल्या काळाचौकी मिंट कॉलनी परिसरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट (Mumbai Kala Chowki Fire) झाला आहे. एका बंद असलेल्या शाळेत स्फोट (Mumbai School Gas Cylinder Blast) झाला आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल  झाल्या. सुदैवाने मोठी दुर्घटना अनर्थ टळला आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  या आगीवर आता अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले आहे. 

मुंबई महापालिकेच्या साईबाबा पथ या मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये सकाळी साडे आठच्या सुमारास आग लागली होती.  या आगीवर आता अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.  मात्र शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. शाळा मागील तीन वर्षापासून बंद आहे.  अतिधोकादायक इमारत असल्यामुळे शाळा बंद होती. कोरोना काळात या ठिकाणी लसीकरण केंद्र होतं.त्यानंतर या ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर आणि गाद्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. 



JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola