Jitendra Awhad : ...तर आम्हालाही भाजप लांब नाही, जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेनेला इशारा

आघाडी सरकार सुरळीत सुरू असले तरी स्थानिक पातळीवर सर्व काही अलबेल नसल्याचे संकेत आव्हाड यांनी दिले आहेत. निवडणूका आल्या की सत्ताधारी शिवसेना वाॅर्ड रचनेत मनमानी करते. आपल्याला निवडणूक जिंकतां यावी यासाठी मनपा अधिकारी , निवडणूक आयोगाचे अधिकारी यांना हाताशी धरून आपल्याला सोईस्कर होईल असे वाॅर्ड रचना करून घेते. हा अनुभव आम्हाला ठाण्यात आला होता.  जर असे मनमानी कृत्य करून वाॅर्ड रचना पाडली जात असेल तर ही लोकशाहीला घातक असून याकडे निवडणूक आयोगाने लक्ष दिले पाहिजे अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola