भूखंड मिळून 33 वर्षांनंतरही क्रिकेट एकादमी सुरू न केल्यानं Jitendra Awhad यांचा गावस्करांना टोला

मुंबई : सध्या लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या गुगलीचा सामना करावा लागत आहे. म्हाडानं क्रिकेटर सुनील गावस्करांना वांद्रे येथं 21 हजार 348 चौरस फुटांचा भूखंड भाडेतत्तवावर दिला आहे. इनडोअर क्रिकेट अॅकॅडमी सुरु करण्यासाठी 33 वर्षांपूर्वी ही जमिन गावस्करांना देण्यात आली होती. मात्र, अनेक वर्ष उलटूनही सुनील गावस्करांनी प्रशिक्षण संस्था सुरु न केल्यामुळं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून गावस्करांना टोला हाणलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola