Jitendra Awhad Oppose to Manusmriti : अभ्यासक्रमात मनुस्मृती नको, जितेंद्र आव्हाड यांचा विरोध

Continues below advertisement

Jitendra Awhad Oppose to Manusmriti : अभ्यासक्रमात मनुस्मृती नको, जितेंद्र आव्हाड यांचा विरोध

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, 'एससीईआरटी'ने  राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. यावरुन राज्यात नव्या वादाची ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी यापूर्वीच मनुस्मृतीच्या (Manusmriti) शालेय अभ्यासक्रमातील समावेशाविषयी नापसंती व्यक्त केली होती. त्यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे या मुद्द्यावरुन कमालीचे आक्रमक झाले आहेत. शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा समावेश करण्याच्या हालचालींना जितेंद्र आव्हाड यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यासाठी जितेंद्र आव्हाड बुधवारी महाड येथे जाऊन मनुस्मृतीची होळी करणार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांनी महाड येथेच मनुस्मृतीची होळी केली होती. ही बाब लक्षात घेत सरकारचा निषेध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड देखील महाड येथेच मनुस्मृतीची होळी करणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram