Jitendra Awhad : अवघ्या अडीच लाखात नवं घर! जितेंद्र आव्हाडांकडून मुंबईकरांना मोठं दिवाळी 'गिफ्ट'
Continues below advertisement
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त केलेल्या समितीने ऐतिहासिक निर्णय घेऊन झोपडीधारकांना दिवाळी भेट दिली आहे. यापुढे एस आर ए अंतर्गत इमारत तोडल्यानंतर अवघ्या पाच वर्षांत झोपडी विकता येणार आहे. तसेच 2011 नंतर बांधलेल्या झोपड्यांनाही आता संरक्षण मिळणार असून अवघ्या अडीच लाखात या झोपडीधारकांना हक्काचे घर मिळणार आहे. सहा महिन्यांपूर्वी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकार परिषदेत पुनर्विकास योजनेत समाविष्ट असलेल्या झोपड्या निष्कासनानंतर पाच वर्षात विकण्याची मुभा देण्याबाबत सुतोवाच केले होते. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठण करण्यात आले होते.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement