Jitendra Awhad and Sheetal Mhatre : जितेंद्र आव्हाड आणि शीतल म्हात्रे यांच्यात ट्विटर वॉर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांच्यात जोरदार ट्विटर वॉर सुरू आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार शेरेबाजी सुरू आहे. एकमेकांच्या ट्विटला टॅग करत हे नेते एकमेकांवर तोंडसुख घेताना दिसतायत. उद्धव ठाकरे यांच्या मालेगावातील सभेतील ऊर्दूच्या पोस्टरवरून ही शाब्दिक चकमक उडालीये.. शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांचे ऊर्दूतील पोस्टर ट्विट केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंब्र्यातील ऊर्दूमधील पोस्टर ट्विट करत, ताई… यावर बोला, असं आव्हानच दिलं. त्यानंतर पुन्हा दोन्ही नेत्यांमध्ये ट्विटचा सिलसिला सुरू झालाय.