J. P. Nadda : भाजप राष्ट्रीय अध्यक्ष उद्या मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन

Continues below advertisement

J. P. Nadda : भाजप राष्ट्रीय अध्यक्ष उद्या मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. मुंबईतील ३ लोकसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांचं उद्या संमेलन आहे. जे.पी. नड्डा उद्या संध्याकाळी ६ वाजता अंधेरीतील भाजप कार्यर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अंधेरीतील हनुमान मंदिराशेजारी असलेल्या बीएमसी मैदानात कार्यकर्ता संमेलन आहे. तिथे अंधेरीतील कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचीही प्रमुख उपस्थिती असेल. उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई , उत्तर पश्चिम मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram