J.J Hospital च्या नेत्र चिकित्सा विभागात संप, डॉ.लहाने यांचा राजीनामा मिळालेला नाही : डीन
मुंबईतील जे.जे. रुग्णालयातून.. नेत्रशल्य चिकित्सा विभागातील सर्व प्राध्यापकांनी राजीनामा दिल्यानंतरही निवासी डाॅक्टरांचं आंदोलन सुरुच आहे. डाॅ. तात्याराव लहाने आणि डाॅ. रागिणी पारेख यांच्यावर निवासी डॉक्टरांनी मनमानीचा आरोप केला आहे. डॉ. लहाने पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेच्या संधी देत नाहीत, संशोधन कार्याचाही विभागात अभाव आहे, तसंच निवासी डॉक्टरांना सातत्यानं असंसदीय वर्तन सहन करावं लागतं, असे गंभीर आरोप या संपकरी डॉक्टरांनी केले आहेत. डाॅ. लहाने आणि डाॅ. पारीख यांची बदली करण्याची मागणी या निवासी डॉक्टरांनी केली आहे.