इस्राईलकडून कोरोना रुग्ण ओळखण्याचं तंत्रज्ञान विकसित, तंत्रज्ञान यशस्वी झाल्यास भारतात आणलं जाणार!
सर्वसामान्य व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली आहे की नाही हे कळण्यासाठी इस्राईल ने आवाजावरून कोरोणा ओळखण्याचं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. या तंत्रज्ञानासाठी मुंबई महापालिका आणि नेस्को कोव्हिडं सेंटर्स च्या वतीने नेस्को सेंटर मध्ये उपचार घेणाऱ्या दोन हजार रुग्णांचे चार हजार आवाजाचे नमुने संकलित करण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहे. तपासणी मध्ये जर हे तंत्रज्ञान यशस्वी झालं तर ते तंत्रज्ञान भारतामध्ये आणण्यात येणार आहे.