Kirit Somaiyya : हसन मुश्रीफांची चौकशी करा, पुरावे देण्यासाठी किरीट सोमय्या ईडी कार्यालयात
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKirit Somaiya Allegations on Hasan Mushrif : ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यानं केलेल्या घोटाळ्याचा पाढा माध्यमांसमोर वाचणार असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जाहीर केलं होतं. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचं नाव जाहीर केलं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच यासंदर्भात सर्व पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, "ठाकरे सरकारच्या डर्टी 11 संघामध्ये राखीव खेळाडूंची संख्या वाढत चालली आहे. मी आणखी एका नेत्याचं नाव यात वाढवत आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुशरीफ यांचं नाव मी या संघामध्ये वाढवत आहे. हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांनी शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. 2700 पानांची एक फाईल मी आयकर विभागाला दिली आहे."