Palghar Ragging | महिला डॉक्टरच्या रॅगिंगप्रकरणी पालघरमध्ये 15 डॉक्टरांवर गुन्हा | ABP Majha
Continues below advertisement
प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या रॅगिंगप्रकरणी पालघर पोलिसांत एम एल ढवळे रुग्णालयातील 15 वरिष्ठ डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसिक इजा पोहोचवल्याप्रकरणी पालघर पोलिस ठाण्यात या महिला डॉक्टरने शुक्रवारी (15 नोव्हेंबर) तक्रार नोंदवली. या 15 वरिष्ठ डॉक्टरांविरोधात महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा कलम 4 अन्वये गुन्ह्याची नोंद झाली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Continues below advertisement