Afganistan : काबूल विमानतळावर भारतीयांसोबत जे झालं त्यात Taliban ऐवजी Pakistan गुप्तचर यंत्रणा असल्याचा संशय
Continues below advertisement
अफगाणिस्तानात काबुल विमानतळावर दीडशे भारतीयांना तालिबान्यांनी ताब्यात घेतल्याचं धक्कादायक वृत्त हाती आलं होते. आता या दीडशे भारतीयांना ताबिलान्यांनी सोडल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व भारतीय हे सुरक्षित असून त्यांचा पासपोर्ट तपासल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे. अपहरणाच्या वृत्तानंतर तालिबान्यांनी हे वृत्त फेटाळले. आम्ही भारतीयांचं अपहरण केलं नसून त्यांना सुरक्षित स्थळी नेल्याचा दावा तालिबान्यांच्या प्रवक्त्यांनी केला होता. तसेच अपहरण केल्याचे वृत्त तालिबान्यांनी फेटाळले होते. तालिबानी प्रवक्ता अहमद्दुल्ला वसीक यांनी हे वृत्त निराधार असून तालिबान अशी कृती कधीच करणार नाही, असे ते म्हणाले.
Continues below advertisement