Sayaji Shinde | झाडांच्या लागवडीत पैसे खाऊन काय मिळणार, सयाजी शिंदेशी खास बातचीत | ABP Majha

Continues below advertisement
खरंतर मागच्या 70 वर्षांत वृक्ष लागवड कशी झाली याची चौकशी व्हायला हवी. बाकी या चौकशीतून काय साध्य होणार हा प्रश्न आहे.  या चौकशीत न पडता, चांगली झाडं लावू, ती जगवू, तरुणांना घेऊन ही चळवळ मोठी करण्यात रस आहे, असं मत अभिनेते आणि सह्याद्री देवराई चळवळीचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले आहे. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, झाडांची आकडेवारी वाढवणारा नाही तर ती झाडं जगवण्याचा प्लॅन केला पाहिजे. झाडं जगलीत का हे पाहण्यासाठी आम्ही झाडांचे वाढदिवस करणं सुरू केलं. झाडांच्या बाबतीत तरी सर्वांचे हेतू चांगले असायला हवेत, असं सयाजी शिंदे म्हणाले.
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram