Mumbai Local : मध्य रेल्वेवर महामेगाब्लॉक, 1 आणि 2 जूनला 600 लोकल फेऱ्या रद्द होणार?

Continues below advertisement

मुंबई : लोकल प्रवाशांसाठी (Local Train) मोठी बातमी आहे. 1 आणि 2 जून रोजी मध्य रेल्वेकडून विशेष मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. यामुळे 1 आणि 2 जूनला सुमारे 600 लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या नूतनीकरणासाठी मध्य रेल्वेकडून हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावरील लोकल रद्द करण्यात येण्याची शक्यता आहे. 

1 आणि 2 जून रोजी 36 तासांचा ब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 24 डब्यांच्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म 10 आणि 11 च्या विस्तार करण्याचं काम सुरु आहे.  प्लॅटफॉर्म 10 आणि 11 चा विस्तार आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे विशेष ब्लॉक चालवण्यात येणार आहे. त्यामुळे 1 आणि 1 जून रोजी 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. परिणामी सुमारे 600 लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे.

सुमारे 600 लोकल रद्द होण्याची शक्यता

सीएसएमटी स्थानकातील एक्सप्रेस गाड्यांच्या प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यासाठी आणि यार्ड नूतनीकरणाच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. 1 आणि 2 जून रोजी मध्य रेल्वेवर 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे मुख्य आणि हार्बर मार्गावरील सुमारे 600 लोकल रद्द होण्याची शक्यता आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram