INDIA Mumbai Meeting :INDIAची आजपासून मुंबईत दोन दिवसीय बैठक,संध्याकाळी साडेसहा वाजता अनौपचारिक बैठक
abp majha web team
Updated at:
31 Aug 2023 09:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबातमी INDIAच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीची.. सांताक्रुझच्या फाईव्ह स्टार ग्रॅण्ड हयात येथे शुक्रवारी सकाळी ही बैठक होणार असून, त्यासाठी देशभरातील अनेक दिग्गज नेते मुंबईत दाखल झालेत. ममता बॅनर्जी, फारुख अब्दुल्ला, लालूप्रसाद यादव यांच्यासह अनेक नेते मुंबईत पोहोचले आहेत, आज मल्लिकार्जुन खर्गे, एम. के. स्टॅलिन मुंबईत पोहोचणार आहेत. तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी, उमर अब्दुल्ला, अखिलेश यादवही आज मुंबईत येणार आहेत. त्याचसोबत INDIA आघाडीचे इतरही नेते मुंबईत दाखल होतील. त्यानंतर सहा वाजता सर्व नेत्यांचं स्वागत होईल आणि साडेसहा वाजता सर्व नेत्यांची अनौपचारिक बैठक होणारेय. आणि रात्री ८ वाजता मराठमोळ्या पदार्थांच्या भोजनाची पंगतही आयोजित करण्यात आलीय.