Bhiwandi मध्ये भांडण सोडवणं पडलं महागात, हत्येप्रकरणी एकाला पोलिसांकडून अटक : ABP Majha

Continues below advertisement

भिवंडी शहरातील गैबीनगर परिसरात एका युवकाला लहान मुलाचे भांडण सोडवणं युवकाच्या जीवावर बेतलंय. भांडण सोडवण्याचा राग मनात धरून युवकाची हत्या केलीये. वफा कॉम्प्लेक्सच्या परिसरात दोन ते तीन तरुण एका अल्पवयीन मुलाला प्रेम करण्याच्या संशयावरून पकडून मारहाण करत होते. त्यातच त्यांचे भांडण फरहान शेख या तरुमानं पाहीलं आणि ही भांडणं त्यानं सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याचाच राग मनात धरुन रियाज अन्सारी या तरुणानं फरहान शेखवर चाकूने हल्ला केलाय. दरम्यान उपचाराअंतीच याचा फरहानचा मृत्यू झालाय.  दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन एका आरोपीला ताब्यात घेतलंय. या घटनेनं परिसरात सध्या भीतीचं वातावरण पसरलंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram