Mumbai Local Travel : लोकलमधून प्रवास करताना पासधारकांना ओळखपत्र बंधनकारक : ABP Majha
Continues below advertisement
बनावट यूटीएस आणि लोकल पासच्या घटना वाढल्याने रेल्वेच्या डोकेदुखीत भर पडली आहे.या प्रकाराला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने पाससंदर्भातील नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार लोकल प्रवासादरम्यान पासधारकांना आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना किंवा मतदान कार्ड यापैकी एक मूळ ओळखपत्र जवळ बाळगणं बंधनकारक करण्यात आलं आहे. रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाविरोधात प्रवाशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, हा नाहक त्रास देण्याचा प्रकार असल्याचा आरोप होत आहे.
Continues below advertisement