मी माझ्या वक्तव्यावर ठाम; मुंबई, महाराष्ट्रासाठी कितीही वेळा तुरुंगात जायला तयार : प्रताप सरनाईक

Continues below advertisement

राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि अभिनेत्री कंगना रनौतमधील आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक काल कंगना रनौत जर मुंबईमध्ये आली तर शिवसेनेच्या रणरागिणी कंगणाचं थोबाड फोडतील असं वक्तव्य केलं होतं. यावरुन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सरनाईकांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

यावरुन शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ‘मी माझ्या वक्तव्यावर ठाम’ असल्याचं ट्विट केलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram