Mumbai Khar : मुंबईतील उच्चभ्रू परिसरात पतीने केला पत्नीवर चाकू हल्ला : ABP Majha

Continues below advertisement

मुंबईच्या उच्चभ्रू खार परिसरामध्ये एका पतीने आपल्या पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडलीय..हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असुन तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धारावीत राहणारं हे दाम्पत्य काल संध्याकाळी वॉकसाठी खारमध्ये आलं होतं. वॉक करताना त्यांच्यात वाद झाला, आणि पतीनं पत्नीवर चाकूनं हल्ला केला. आरोपी पती सध्या फरार आहे. घटनेची माहिती मिळताच खार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला रुग्णालयामध्ये दाखल केलं. हा गुन्हा रागाच्या भरात घडला, की पत्नीच्या हत्येचा कट पतीनं आधीच रचला होता, याचा तपास पोलीस करत आहेत 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram