हृषिकेश देशमुख चौकशीला हजर राहणार नाहीत, कायदेशीर मार्गांची चाचपणी केल्यानंतरच चौकशीला हजर राहणार
Continues below advertisement
Money Laundering Case : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अटक केली आहे. पण देशमुख कुटुंबियांच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. ईडीनं अनिल देशमुखांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर आता त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख ईडी (ED) च्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे. अनिल देशमुखांचे सर्व पैशांचे व्यावहार मुलगा ऋषिकेश पाहात असल्याचं तपासात उघड झालं आहे, त्यामुळं ईडीनं ऋषिकेश देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.
Continues below advertisement