Water Logging | मुंबईत अतिमुसळधार, किंग्स सर्कल परिसरात पाणी साचलं, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
Continues below advertisement
मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सध्याची वेळ ही ऑफीस मधून घरी जाणाऱ्यांची आहे. अशावेळी मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडल्याचं चित्र आहे. एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे प्रचंड वाहतूक यामुळे नागरिकांना प्रवास करताना अडथळे येत आहेत, हिंदमाता, दादर, परळ परिसरात दरवर्षीच पावसाने पाणी साचतं मात्र नागरिकांना प्रत्येकवर्षी होणाऱ्या या त्रासाला पालिकेनं लवकरात लवकर काहीतरी मार्ग शोधायला हवा.
Continues below advertisement