Mumbai Rains : मुंबईच्या सखल भागात पाणी साचलं, सायनमध्ये रस्त्यांना नदीचं स्वरुप
मुंबईसह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मान्सूनचं मुंबई आगमन झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पहिल्याच पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. सायनच्या गांधी मार्केटमध्येही एक ते दीड फूट पाणी साचलं आहे. यामुळे वाहनचालकांना अडचणी येत आहेत.