Mumbai Rains | मुसळधार पावसाने मुंबईसह उपनगराला झोडपले; दहिसर नदीला पूरस्थिती

मुंबई शहर आणि उपनगरात आजही मुसळधार पाऊस सुरुच आहे. हवामान विभागाने मुंबई परिसरात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे. कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचलं आहे.

दरम्यान, हवामान अंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरात आज मुसळधार पावसाची शक्यता असून समुद्रास दुपारी 12:47 वाजता भरती आहे. मुंबईकरांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, समुद्रकिनारे तसंच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहावं, असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola