Mumbai Rain : मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ
मुंबई : मुंबईतील विविध भागात आज मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि पालघर या भागात पावसाच्या सरी बरसण्याचा इशारा देण्यात आला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. पूर्व उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे काही नागरिकांची तारांबळ उडाली आहे.