तुर्भे पोलिस स्थानकात पाण्यात उभं राहून काम करण्याची वेळ, पावसाच्या पाण्यामुळे कागदपत्रंही भिजली
Continues below advertisement
मुंबई (Mumbai) आणि उपनगरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा परिणाम वाहतुकीवरही झाला असून अनेक भागांतील वाहतूक विस्कळित झाली आहे. सीएसटीएम वरुन जाणाऱ्या एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या असून कल्याण-मुंबई लोकल सेवाही ठप्प झाली आहे.
मुंबईतील दादर, परळ परिसरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सोबतच दक्षिण मुंबईतही पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. पुढील काही तासात मुंबई जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं आयएमडी मुंबईने काल रात्री साडे बारा वाजता जाहीर केलं होतं. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागांत पाणी साचण्यात सुरुवात झाली आहे.
Continues below advertisement
Tags :
Heavy Rain Maharashtra Rain Navi Mumbai Mumbai Rain Turbhe Turbhe Police Turbhe Police Station Maharashtra Rain\