Heavy Rain | Vasai-Virar मध्ये जनजीवन ठप्प, NDRF कडून रेस्क्यू

वसई-विरार आणि नालासोपारा शहरात आज पावसाचा मोठा तडाखा बसला. यामुळे संपूर्ण जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेला होता, तर अंतर्गत रस्तेही पूर्णपणे भरले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वसई आणि नालासोपारा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे उशिराने धावत होत्या, काही ठिकाणी तर रेल्वे सेवा बंद पडली होती. वसईच्या मधुबन परिसरातील स्मार्ट सिटीमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी भरले. वाघरालपाडा येथे एनडीआरएफची टीम दाखल झाली आणि अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी बोटींचा वापर करण्यात आला. वसईच्या वाघरालपाडा आणि भोईदापाडा या ठिकाणी दोनशे जणांना रेस्क्यू करण्यात आले. कामनच्या सारजा मोरे येथेही एनडीआरएफच्या टीमने दीडशे लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. वसईच्या मिठागर परिसरात शंभर कुटुंबे आणि एकूण चारशे नागरिक राहतात, तेथेही पाणी भरले होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola