High Court Verdict : बलात्काराचे परिणाम फक्त पीडितेवर नव्हे, तर संपूर्ण समाजावर होतात : हायकोर्ट
बलात्काराच्या गुन्ह्यांत पीडितेसह समाजाला न्याय देण्यासाठी गुन्हेगारांना कठोर शिक्षा करायला हवी असं महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलंय. पुण्यात 10 वर्षांपूर्वी झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी निकाल देताना न्यायालयानं हे मत नोंदवलं. सत्र न्यायालयानं तीन आरोपींना दिलेली जन्मठेपेची शिक्षाही उच्च न्यायालयानं कायम ठेवली. बलात्काराचे परिणाम केवळ पीडितेवर नव्हे तर समाजावरही होतात. त्यामुळे गुन्हेगारांना दिलेल्या शिक्षेतून पीडिता आणि समाजालाही न्याय मिळाला असं वाटायला हवं, असं न्यायालयानं म्हटलंय.