Arun Gawli | कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी अरुण गवळीची जन्मठेप हायकोर्टाकडून कायम | ABP Majha
Continues below advertisement
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीसह इतर आरोपींना सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (9 डिसेंबर) कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. 2 मार्च 2007 रोजी शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची मुंबईतील असल्फा भागात हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी त्यांच्या राहत्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला होता. पोलीस तपासाअंती मारेकऱ्यांनी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या सांगण्यावरुनच ही हत्या केल्याचं सांगितलं होतं.
Continues below advertisement