Hawkers Zone | दादरच्या मनसे कार्यालयाबाहेर फेरीवाल्यांसाठी राखीव जागा, शिवसेना-मनसेत जुंपण्याची चिन्ह

अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध मनसेनं मोर्चा काढला होता. पण आता याच मनसेच्या कार्यालयाबाहेर फेरिवाले बसण्याची शक्यता आहे. कारण सरकारनं आखलेल्या नव्या फेरिवाला धोरणात मनसेच्या दादरमधील राजगड या कार्यालयाबाहेरील जागा फेरिवाल्यांसाठी राखिव ठेवण्यात आलीय. नव्या धोरणानुसार राजगडाबाहेर १०० फेरिवाल्यांना बसवण्याचा निर्णय घेतलाय. यावर मनसेनं तीव्र नाराजी व्यक्त केलीय. कुठल्याही राजकीय पक्षाला विचारात न घेता हा निर्णय झाल्याचा आरोप मनसेनं केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola