Crime: गुटखा विक्रिच्या वादातून कल्याण टिटवाळा दरम्यान धावत्या एक्स्प्रेसमध्ये फेरीवाल्यांमध्ये राडा
कल्याण ते टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या एक्स्प्रेसमध्ये काल सायंकाळी दोन फेरीवाल्यांनी एका फेरीवाल्यावर ब्लेडने वार केल्याची घचटना घडली आहे. या हल्ल्यात फेरीवाला जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल सायंकाळी गोरखपूर एक्सप्रेसमध्ये तीन फेरीवाल्यांमध्ये गुटखा विक्रीवरुन जोरदार वाद झाला. यावेळी अंकुश सरोज आणि मोहम्मद शेख या दोन फेरीवाल्यांनी पवन गुप्ता या फेरीवाल्यावर ब्लेडने वार केले. याप्रकरणी पोलिसांनी अंकुश आणि मोहम्मद या दोन्ही फेरीवाल्याना अटक केली आहे. तर, पवन गुप्ता हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. दरम्यान या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.