तमाशा कलावंतांच्या व्यथा ऐकून महाराष्ट्र हेलावला, सरकारकडून मदतीचं मंत्री हसन मुश्रीफ यांचं आश्वासन
Continues below advertisement
मुंबई : ज्यांनी लोककला काळजापलीकडे जपली, जोपासली, ते तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी आज एबीपी माझा कट्ट्यावर पाहायला मिळाली. कोरोनाच्या संकटात तमाशा कलावंतांच्या आयुष्याची झालेली परवड, त्यांचं दु:ख या दोघांनी रसिकांसमोर मांडले. लॉकडाऊनकाळात समाजातील अनेक घटकांना सरकारने मदत केली. मात्र, अद्याप तमाशा कलावंतांना कोणतीही मदत न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
Continues below advertisement