Harvinder Singh Sandhu : दहशतवादी हरविंदर सिंहच्या हिटलिस्टवर होता महाराष्ट्र, खळबळजनक माहिती समोर
कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंह संघु उर्फ रिंदाने महाराष्ट्रात मोठा घातपात करण्याचा कट रचण्यात आला होता, अशी खळबळजनक माहिती समोर आलीय. कल्याण येथे पंजाब ॲन्टी गँगस्टर स्क्वॉड आणि महाराष्ट्र एटीएसने केलेल्या संयुक्त कारवाईत तीन अतिरेक्यांना अटक करण्यात आलीय. या तीनही संशयित दहशतवाद्यांच्या कबुलीजबाबातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.