Harbar Railway line Heavy Rain : पनवेल ते वाशी रेल्वे वाहतूक सुरू, वाशी ते सीएसएमटी बंद

Continues below advertisement

Harbar Railway line Heavy Rain : पनवेल ते वाशी रेल्वे वाहतूक सुरू, वाशी ते सीएसएमटी बंद 

मुंबई: गेल्या काही तासांमध्ये मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळपासूनच मुंबईची लाईफलाईन असणारी रेल्वे सेवा कोलमडून पडली आहे. मध्य रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे सकाळपासून लोकल ट्रेनचे (Mumbai Local Train) वेळाकपत्रक कोलमडले आहे. इतकेच नव्हे तर यामुळे बाहेरुन येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचाही (Express Train) खोळंबा झाला आहे. याचा फटका सामान्य रेल्वे प्रवाशांसोबत आमदार आणि मंत्र्यांनाही बसताना दिसत आहे. सायन स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पावसाचे पाणी साठून एक्स्प्रेस ट्रेन अडकून पडल्याने राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील (Anil Patil) आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना रेल्वे ट्रॅकवरुन चालण्याची वेळ आली.

 







 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram