Harbour Railway Issue : हार्बर रेल्वे गेल्या पाऊण तासांपासून ठप्प, नेरूळदरम्यान तांत्रिक बिघाड

Continues below advertisement

Harbour Local Train: हार्बर लाईनवरील (Harbour Line Local) लोकल गेल्या 45 मिनिटांपासून ठप्प असल्याची माहिती समोर आली आहे. नेरुळ दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल रखडल्या आहेत. गेल्या पाऊण तासापासून अनेक गाड्या मध्येच रेल्वे ट्रॅक आणि स्थानकात उभ्या आहेत. हार्बर लाईन ठप्प झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले आहे. सकाळी 7.30 वाजता हार्बर मार्गावरील पनवेल ते सीएसएमटीच्या दिशेने लोकल सुरु झाल्या आहेत. मात्र ठाण्याला जाणाऱ्या लोकल अजूनही रखडल्या आहेत. 

एमयूटीपी-२ अंतर्गत सीएसएमटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग सन 2008 मध्ये मंजूर करण्यात आला होता. रुळांलगत असलेल्या जागेच्या अनुपलब्धतेमुळे सीएसएमटी ते परळ आणि कुर्ला ते परळ अशा दोन टप्प्यांत प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सीएसएमटी ते परळदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गासाठी आता तयारी सुरु झाली आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते परळदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी चाचपणी सुरु आहे. नव्या आराखड्यानुसार पाचवी आणि सहावी मार्गिका टाकायची झाल्यास त्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतुकीत महत्त्वाचे बदल करावे लागणार आहेत. परिणामी भविष्यात हार्बर लोकल सेवेचा प्रवास सँडहर्स्ट रोड स्थानकातच संपेल. तर यापुढे मध्य रेल्वेमार्गावरील (Central Railway) फास्ट लोकल ट्रेन भायखळ्यात थांबणार नाहीत. याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram