ABP News

Gyms Owners | आवश्यक ती सर्व काळजी घेऊ, आम्हाला जीम सुरु करण्याची परवानगी द्या : जीम व्यावसायिक

Continues below advertisement
कोरोना व्हायरसमुळे देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आणि सर्व व्यवसाय ठप्प झाले. सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरीही अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने टप्प्या टप्याने सर्व सेवा सुरळीत करण्यात येत आहेत. परंतु, अद्याप जिम सुरु करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने परवानगी देण्यात आलेली नाही. लॉकडाऊनमुळे साधारणतः साडेचार महिने जिम बंद आहेत. त्यामुळे सरकारकडे जिम पुन्हा सुरु करण्याचा मुद्दा उचलून धरावा यासाठी जिम व्यावसायिक आणि बॉडीबिल्डर्सनी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर भेट घेतली आहे. त्यावेळी राज ठाकरे यांनी 'तुम्ही जिम ओपन करा, बघू काय होतं.' असा सल्ला जिम व्यावसायिक आणि बॉडीबिल्डर्सना दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram