Gunaratna Sadavarte full pc : जरांगेंना अटक करा नाहीतर मी सुद्धा आमरण उपोषण करेन - गुणरत्न सदावर्ते
Gunaratna Sadavarte full pc : जरांगेंना अटक करा नाहीतर मी सुद्धा आमरण उपोषण करेन - गुणरत्न सदावर्ते
वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या गाडीची तोडफोड (Car Vandalizedtion) काही अज्ञातांकडून करण्यात आली आहे. तोडफोडीमागे मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात गुणरत्न सदावर्तेंनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी अनेक गंभीर आरोप गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर केले आहेत. तसेच, मनोज जरांगेंनी तातडीनं अटक करावी, अशी मागणीही यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, "हल्लेखोरांना आणि त्यासोहतच मनोज जरांगेंना मला प्रश्न विचारायचाय. हीच आहे का तुमच्या शांततामय आंदोलनाची व्याख्या? मला सायलेंट केलं जाऊ शकत नाही, मी या भारताचे जे पिलर असतात 50 टक्के जागांचा, ज्या खुल्या वर्गासाठी जागा असतात, त्या वाचवण्यासाठी माझा लढा आहे. या देशाला जातीत जातीत न तोललं जावं, तर गुणवत्तेत तोललं जावं, यासाठी माझा लढा आहे. माझ्या कष्टाचे आणि घामाचे नुकसान तुम्ही केलं. यापूर्वी 32 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण तुम्ही केली. त्यासंबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारण नसताना कारवाई करण्यात आली. तेव्हापासूनच मला अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत."
"माझी मुलगी झेन गेल्या आठ दिवसांपासून शाळेत जात नाही. कारण तिलाही मारण्याच्या आणि माझ्या पत्नीला उचलून नेण्यापर्यंत मला धमक्या येत आहेत. अशा प्रकारचे हल्ले, असा आघात होईल, आम्हाला त्रास दिला जाईल, फोन, व्हिडीओ रेकॉर्डिंग, सोशल मीडियावरच्या धमक्या आम्हाला दिल्या जात आहे." , असंही गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं.