Mumbai Ghatkopar : जुनागडमधील प्रक्षोभक भाषणाप्रकरणी इस्लामी धर्मगुरु Mufti Salman Azhari यांना अटक
Continues below advertisement
इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अजहरी यांना गुजरात पोलिसांनी घाटकोपरमधून अटक केलीये. तसंच त्यांना उशीरा पुढील तपासासाठी गुजरातला नेण्यात आलंय. तर मध्यरात्रीच मुफ्ती अजहरी यांना न्यायाधिशांच्या घरी नेण्यात आलं. तिथेच त्यांना ट्रान्झिट रिमांड घेण्यात येऊन गुजरात पोलिस जुनागडला रवाना झाले. जुनागढमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुजरात एटीएसने मुफ्ती यांच्यावर कारवाई केलीय. तसंच या अटकेसंदर्भात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं त्यांच्या वकीलांकडून सांगण्यात आलंय.
Continues below advertisement