Mumbai : 15 मेनंतर लॉकडाऊन वाढवण्याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल, पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती
मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाचा आलेख अजूनही चढताच आहे. अनेक जिल्ह्यात परिस्थितीत चिंताजनक आहे. अशात सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या मुंबईत मात्र परिस्थिती खूप सकारात्मक आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असून मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही कोरोनाची लागण झालेल्यांपेक्षा जास्त आहे. मागील 24 तासांत मुंबई एकूण 3,039 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4,052 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रिकव्हरी रेट 90 टक्के झाला आहे.
Tags :
Maharashtra News Mumbai Lockdown Latest News Lockdown In Maharashtra Maharashtra Lockdown Aslam Shaikh