GST Collection : सप्टेंबर 2023 मध्ये GST मधून 1.63 लाख कोटी रुपयांचं संकलन
Continues below advertisement
सरकारने सप्टेंबर 2023 मध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST मधून 1.63 लाख कोटी रुपये गोळा केले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 10.2 टक्के अधिक जीएसटी संकलन झालं आहे. सप्टेंबर 2022 मध्ये जीएसटीमधून 1.47 लाख कोटी रुपये जमा झाले होते. सप्टेंबर 2023 मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र टॉप-5 राज्यांमध्ये अव्वल आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात जीएसटी संकलन 17 टक्क्यांनी वाढलं आहे.
Continues below advertisement