Mumbai - Thane : नवा कोपरी पूल उभारण्याचं काम सुरू, जुन्या मुख्य मार्गिका उद्या आणि परवा बंद
Continues below advertisement
पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुंबई आणि ठाण्याला जोडणारा जुना कोपरी ब्रिज पाडून त्या जागी नवा कोपरी ब्रिज उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून आता दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी उद्या आणि परवा दोन दिवस वाहतूक विभागाकडून चाचणी घेण्यात येणार आहे. कोपरी उड्डाणपुलाच्या जुन्या मुख्य मार्गिका दोन दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक शाखेकडून ऐन गर्दीच्या वेळी बंद ठेवण्यात येतील. त्यामुळं 16 आणि 17 नोव्हेंबरला सकाळी साडे सात ते साडे दहा या वेळेत वाहतून गुरुद्वारा सेवा रोड वरून मुंबईच्या दिशेने वळवण्यात येणार आहेत.
Continues below advertisement