Goregaon Fire Update : गोरेगावमधील आगीत 6 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झालाय. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आगीत ३० पेक्षा अधिक दुचाकी आणि ४ कार जळून खाक झाल्यात. तसेच तळमजल्यावरील काही दुकानंही जळून खाक झालेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून, सध्या कुलिंगचं काम सुरु आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola