Gokhale Bridge : नोव्हेंबरपासून गोखले पूल मुंबईकरांच्या सेवेत

मुंबईच्या पश्चिम उपनगराच्या वाहतुकीतल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला अंधेरीचा गोखले पूल पुन्हा सुरू करण्यासाठीची जून महिन्याची डेडलाईन हुकण्याची चिन्हं आहे. त्यामुळं गोखले पूल पुन्हा सुरू होण्यासाठी आता नोव्हेंबर महिना उजाडणार असं दिसतंय. स्टीलच्या पुरवठ्यावर झालेल्या परिणामामुळं या कामाला विलंब होत आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा गोखले पूल गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जून महिन्याच्या अखेरीस गोखले पुलाच्या दोन मार्गिका सुरू करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न होता. पण पुलाच्या बांधकामात गर्डरसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टीलचा पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळं गोखले पुलाच्या कामात विलंब होत असल्याचं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. स्थानिक आमदार अमित साटम यांना बीएमसीच्या आजच्या साईट व्हिजिटमध्ये ही माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola