Chiplun Potholes | मुंबई-गोवा महामार्ग गेला खड्ड्यात, पहिल्याच पावसात रस्त्यांची चाळण, कोट्यावधी पाण्यात
मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. पहिल्याच पावसात रस्त्यांची चाळण झाली आहे. महामार्गावरून प्रवास करताना रस्त्यांवर जागोजागी मोठमोठे खड्डे पाहायला मिळतायत. याच खड्ड्यांतून सध्या प्रवासी प्रवास करतायत. थोड्याच दिवसात गणेशोत्सव असल्याने कोकणात येणारा चाकरमानी याच रस्त्याने प्रवास करणार. कित्येक वर्षे चालू असलेल्या रुंदीकरणाच्या कामाला सध्या ब्रेक लागल्याने अपुऱ्या कामामुळे प्रवाशांना जुन्या रस्त्यांवरून प्रवास करावा लागतोय. हीच परिस्थिती पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटाची आहे. या रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडलेले आहेत, तर गुहागर विजापूर महामार्गाची पण परिस्थिती हीच आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी या रस्त्यासाठी मंजूर झाला, परंतु संथ गतीने आणि आणि अपुऱ्या कामामुळे रस्त्यांवर पाण्याचे डबके साचलेले आहे. रस्ता कुठे आहे हा साचलेल्या पाण्यातून प्रवाशांना शोधण्याची वेळ आली आहे.