Ramdas Athawale UNCUT : 'गो कोरोना गो' नंतर 'गो महाविकास आघाडी गो', रामदास आठवलेंचा नवा नारा


रामदास आठवले यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर नवीब नारा दिला आहे...'गो कोरोना गो' नंतर आता 'गो महाविकास आघाडी गो' असा नारा दिला आहे. 

मध्य प्रदेशचा सत्तेचा व्हायरस लवकरच महाराष्ट्रात येईल आणि राज्यात भूकंप होईल असं भाकीत आठवले यांनी केलं. शरद पवार भूकंप होणार नाही असं म्हणत असले तरी भूकंप सांगून होत नसतात असा टोला आठवले यांनी पवारांना लगावला. आता फक्त हा व्हायरस मध्यप्रदेशातून थेट महाराष्ट्रात येतो की राजस्थान मधून एंट्री करतो हे बघावं लागेल असं सूतोवाच आठवले यांनी केले

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola