Ghatkopar, Mumbai : राज्यपाल कोश्यारींविरोधात सेने आक्रमक; घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवर रास्तारोको
त्रपती शिवाजी महाराजांबद्दल विवादात्मक वक्तव्य केल्याच्या विरोधात आता शिवसेना आक्रमक झाली आहे.आज शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने घाटकोपर अंधेरी लिंक रोड वर रस्ता रोको केले. या वेळी शिवसैनिकांनी चार ही मार्गावर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी करीत कोशारी यांचा निषेध केला.सुमारे अर्धा तास हे आंदोलन सुरू होते.या मुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.