Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला 24 तास, बचावकार्य अजूनही सुरुच!
Continues below advertisement
घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेला २४ तास होऊन गेले तरी बचावकार्य अजूनही सुरूच आहे. सांगाड्याचा ३० ते ४० टक्के भाग काढण्यात आलाय. अजूनही ६० ते ७० टक्के काम अजूनही बाकी आहे. संपूर्ण सांगाडा काढायला अजूनही २४ तास लागण्याची शक्यता आहे. अपघातात १४ जणांचा मृत्यू झालाय. तर ८८ जण जखमी झालेत. ४४ जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील एका जखमीची प्रकृती गंभीर आहे. मोठ्या क्रेनच्या सहाय्याने हा ढिगारा हलवला जातोय. पेट्रोल पंपावर आग लागू नये यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाण्याची फवारणी केली जातेय.
Continues below advertisement